Chitrapat Mahotsav

Sanskruti Kala Darpan Chitrapat Mahotsav

गेल्या पाच वर्षामध्ये चित्रपट व्यवसायाने कात टाकली..तो डिजिटल झाला आणि कोल्हापूर पुणे मुंबईची मिरासदारी लहानमोठ्या गावातील दिग्दर्शकांनी मोडून काढली आणि मराठी चित्रपटांचा चेहरामोहराच बदलला..कस वाढला..पत वाढली.. प्रेक्षक चित्रपट गृहात गर्दी करू लागला.. टिंग्या, देउळ, धग, सारखे चित्रपट राष्ट्रीय अंतराष्ट्रीय स्तरावर गाजू लागले..

हताळलेले विषय..त्यांची मांडणी अन त्याद्वारे मांडलेले विचार..मराठी चित्रपटसृष्टीला सोन्याचे दिवस आले.

संस्कृती कला दर्पण चित्रपट महोत्सवात ह्याचे पडसाद उमटू लागले. गेल्या चार वर्षात झालं असं कि संस्कृती कला दर्पणच्या परीक्षकांनी बक्षिसपात्र ठरवलेल्या चित्रपटाना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही पारितोषिके मिळाली अन संस्कृती कला दर्पणच्या निवडीबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील विश्वासार्हता वृदिंगत झाली. वर्षभरातले उत्तम दहा चित्रपट एकाच वेळी एकाच ठिकाणी पाहायला मिळाल्याने ह्या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळतो.

चित्रपटाच्या प्रत्येक विभागासाठी पारितोषिक आणि पहिल्या क्रमांकासाठी रुपये दोन लाख, दुसऱ्यां क्रमांकासाठी रुपये दीड लाख, आणि तिसऱ्यां क्रमांकासाठी रुपये एक लाख असे भरगोस बक्षीस दिले जाते..रोख रकमेचे बक्षीस देणारी संस्कृती कला दर्पण ही एकमेव संस्था आहे.

अल्पावधीतच संस्कृती कला दर्पण चित्रपट महोत्सव महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात लोकप्रिय झाला आहे.

Contact Us

About Us

Sanskruti kala Darpan (SKD) is one of the recognized and well- accepted social organisation in the Marathi Film Theater Industry.

From past eleven years the organisation has been consecutively conducting award ceremonies in various art forms in Maharashtra.

Follow Us