Jestha Rangkarmi Sanmaan Sohla

Jestha Rangkarmi Snehsamelan and Sanmaan Sohla

अर्चना नेवरेकर फौंडेशन तर्फे जेष्ट रंगकर्मी स्नेहसंमेलन व सन्मान सोहळा हा आगळावेगळा आणि सामाजिक जाणीवेच्या ध्यासातून ह्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. आयुष्भर तळमळीने रंगभूमीवर कार्यरत असणारी मंडळी आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा प्रकाशझोताच्या बाहेर होतात तेव्हा मात्र त्यांच्यापाशी श्री शिल्लक नसतेच...दृष्टी आड सृष्टी ह्या नियमानुसार प्रेक्षकांची मायाही पातळ झालेली असते.. अश्यावेळी त्यांना खऱ्या आधाराची गरज असते.. तितकीच आर्थिक मजबुतीचीही असते... ह्या उपक्रमात जेष्ट कलाकारांना मोफत आरोग्य चिकित्सा व आर्थिक मदत दिली जाते. त्याच बरोबर SKD क्लब च्या ह्या जेष्टसदस्यांना वर्षभर होणार्या कार्यक्रमाना मुफ्त प्रवेश ही देण्यात येतो.

आर्थिक आधाराबरोबरच आपल्या जुन्या स्नेह्यांच्या गाठीभेटी आणि नव्या पिढीशी संवाद आणि त्यांना भेटायला आलेल्या लोकांच्या गर्दीने हे जेष्ट रंगकर्मी भाराऊन जातात आणि अजूनही लोकांना आपली जाणीव आहे ही भावना त्यांना सुखावून टाकते.

संकृती कलादर्पणचा जेष्ट रंगकर्मी स्नेहसंमेलन व सन्मान सोहळा हा ह्या सगळ्याचं भावनात्मक समर्पक मिश्रण आहे.

हजून माहिती साठी

डावनलोड करा

Contact Us

About Us

Sanskruti kala Darpan (SKD) is one of the recognized and well- accepted social organisation in the Marathi Film Theater Industry.

From past eleven years the organisation has been consecutively conducting award ceremonies in various art forms in Maharashtra.

Follow Us