Natya Mahotsav

Sanskruti Kala Darpan Natya Mahostav

मराठी माणूस हा नाटकवेडा...संगीत नाटकांपार्सून सुरु झालेलं हे नाट्यप्रेम पिढीदरपिढी वाढतच आहे. आणि म्हणूनच नव्या दमाचे नाट्यलेखक दिग्दर्शक आणि अभिनय संप्प्न कलाकार मराठी एकांकिका आणि नाटकातून ह्या कलासृष्ट्टीला मिळत आहेत.

चित्रपट आणि टीव्ही वाहिन्यांची भरभराट होऊनसुद्धा हा नाटकवेडा मराठी प्रेक्षक नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहात गर्दी करतच असतो.

व्यावासिक रंगभूमीवर होणारे निरनिराळे प्रयोग हे मायबाप प्रेक्षकांच्या विश्वसनीय प्रतिसादामुळेच… कलाकारांचा कसदार जिवंत अभिनय अन विषयांची नाविन्यपूर्ण हाताळणी असलेल्या नाटकांचे जे प्रयोग वर्षभर होत असतात अश्या नाटकांपैकी उत्तमोत्तम नात्यकृतीतील निवडक व दर्जेदार दहा नाटकांचे प्रयोग संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सवातून एकाच छताखाली प्रेक्षकांना पाहण्यास मिळतात… ह्या स्तुत्य उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद आनंददायी आहे…

व्यावसायिक नाट्यस्पर्धेत पहिल्या क्रमाकांसाठी रुपये दीड लाख, दुसर्यां क्रमाकांसाठी रुपये एख लाख, आणि तिसर्या क्रमाकांसाठी रुपये पंचाहत्तर हजार असे भरगोस बक्षीस दिले जाते.. रोख रकमेचे बक्षीस देणारी संस्कृती कला दर्पण हि एकमेव संस्था आहे.

संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सव हि नात्याप्रेमिंसाठी जणू पर्वणीच असते.

Contact Us

About Us

Sanskruti kala Darpan (SKD) is one of the recognized and well- accepted social organisation in the Marathi Film Theater Industry.

From past eleven years the organisation has been consecutively conducting award ceremonies in various art forms in Maharashtra.

Follow Us