Shaleya Upkram

Shaleya Upkram

अर्चना नेवरेकर फौंडेशन आयोजित संस्कृती कला दर्पण आंतरशालेय कलागुण नैपुण्य स्पर्धा.

मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्यातील कला व कलाकार ह्याला एका उत्तम व्यासपीठाची शाळेपासूनच गरज असते. आणि म्हणूनच संस्कृती कला दर्पणने २००० साली संस्था उभी करून मुलांच्या आंतरशालेय कलागुण नैपुण्य स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले. दरवर्षी जुलै महिन्यात सर्व शाळांना स्पर्धेचे परिपत्रक पाठवून स्पर्धेचे आयोजन केले जाते.

संस्कृती कला दर्पण आंतरशालेय कलागुण नैपुण्य स्पर्धे अंतर्गत – चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर, निबंध, ग्रीटिंग कार्ड,वक्तृत्व, गीतगायन, नाट्यप्रवेश, वेशभूषा, रेकॉर्ड डान्स आणि लावणी नृत्य तसेच नोव्हेंबर मध्ये आंतरशालेय लोकनृत्य व बालनाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते.

ह्याच क्षेत्रातील मान्यवर ह्या स्पर्धेसाठी आदरणीय परीक्षक म्हणून काम पाहतात. ह्या स्पर्धेचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून संथेचा उर अभिमानाने फुलतो. सांस्कृतिक क्षेत्रात आज नवनवीन कलाकार आपणास पाहायला मिळतात हे उद्याचे कलाकार घडवण्याचे काम संस्कृती कला दर्पण अगदी आनंदाने करते.

Contact Us

About Us

Sanskruti kala Darpan (SKD) is one of the recognized and well- accepted social organisation in the Marathi Film Theater Industry.

From past eleven years the organisation has been consecutively conducting award ceremonies in various art forms in Maharashtra.

Follow Us